
फ्लॉटिंगच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक
पुणे - बंगलो आणि फार्म हाऊससाठी प्लॉट देण्याच्या बहाण्याने सुमारे ४५० गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी साईरंग डेव्हलपर्स प्रा. लि.च्या संचालकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी हा आदेश दिला. याबाबत सार्इरंग डेव्हलपर्स आणि संचालकाचे म्हणणे समजून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता तो होवू शकला नाही.
किझुक्कुम परमबील मलिक ऊर्फ के. आर. मलिक (वय ५६, रा. बाणेर) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. याबाबत संतोष वासुदेव नाटेकर (वय ६३, रा. कर्वेनगर), उदय अरूण बक्षी आणि अतुल पांडूरंग गोडसे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मलिक याच्यासह शाहरुख मलिक, कार्यकारी संचालक नंदिनी रणजित कोंढाळकर, पीटर आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मलिक याने हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी त्यास विरोध केला. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. २० एकर जमिनीचा मालक असताना मलिक याने ३०० एकर जागा विकसित करीत असल्याचे दाखवले असल्याचे तपासातून समोर आले आहे. गुंतवणूकदारांची सुमारे सहा कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा युक्तिवाद ॲड. वाडेकर यांनी केला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87200 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..