पुण्यातील घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील घाट परिसरात
पावसाचा ऑरेंज अलर्ट
पुण्यातील घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट

पुण्यातील घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः पुणे शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. गुरुवारी (ता. ४) सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर कायम होता. तर शुक्रवारी ही शहर आणि परिसरातील काही भागात पावसाने हजेरी लावली. शहरात सायंकाळपर्यंत १५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. शनिवारी (ता. ६) जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
पुणे शहरात शुक्रवारी (ता. ५) दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. त्यात अधूनमधून काहीसे ऊन ही पडत होते. तर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी देखील हजेरी लावली होती. हवामानशास्त्र विभागाने जिल्ह्याच्या घाट परिसरात पुढील चार दिवस जोरदार ते अतिवृष्टीच्या पावसामुळे ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणासह शहर व परिसरात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पुणे व परिसरात जोरदार ते मध्यम सरींचा इशारा देण्यात आला आहे. घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी या भागात प्रवास करताना काळजी बाळगण्याचे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

पुणे परिसरातील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
पुणे ः १५
लोहगाव ः ४.४
पाषाण ः ११
चिंचवड ः १
मगरपट्टा ः १.५

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87246 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..