पहिल्या फेरीतील ४८ टक्के विद्यार्थ्यांनी केला प्रवेश निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या फेरीतील ४८ टक्के
विद्यार्थ्यांनी केला प्रवेश निश्चित
पहिल्या फेरीतील ४८ टक्के विद्यार्थ्यांनी केला प्रवेश निश्चित

पहिल्या फेरीतील ४८ टक्के विद्यार्थ्यांनी केला प्रवेश निश्चित

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या नियमित फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारणत: ४८.३० टक्के विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केला आहे. तर उर्वरित २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शनिवारपर्यंत (ता. ६) मुदत देण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत होत आहेत. या प्रक्रियेतील पहिली नियमित गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. या यादीत जवळपास ४२ हजार ७०९ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये ॲलॉट झाली आहेत. त्यातील आतापर्यंत २० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर ३३ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला आहे. जवळपास ५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन तो रद्द केल्याचे दिसून येत आहे.

प्रवेश फेरीदरम्यान पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या फेरीत २४ हजार ६७१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, त्यातील केवळ ६७.२८ टक्के म्हणजेच १६ हजार ६०१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87261 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..