कलमाडी दहा वर्षांनंतर पुणे महापालिकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलमाडी दहा वर्षांनंतर पुणे महापालिकेत
कलमाडी दहा वर्षांनंतर पुणे महापालिकेत

कलमाडी दहा वर्षांनंतर पुणे महापालिकेत

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : एकेकाळी महापालिकेवर एकहाती वर्चस्व ठेवणारे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शुक्रवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. तब्बल दहा वर्षांनंतर कलमाडी या इमारतीत आले होते. पुणे फेस्टिव्हलच्या निमित्ताने कलमाडी यांनी आयुक्तांची भेट घेतली.

कलमाडी यांच्या पुढाकारातून दरवर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुणे फेस्टिव्हल होतो. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या महोत्सवाचे यंदा ३४ वे वर्ष आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा महोत्सव झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी हा फेस्टिव्हल दिमाखात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात कलमाडी यांनी स्वत: लक्ष घातले आहे. या निमित्त त्यांनी महापालिकेत येऊन आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली.

सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील मेट्रो आणि रस्ते विकासाची कामे तातडीने पूर्ण करावीत, गणेश कला क्रीडा रंगमंचाबरोबरच, बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी फेस्टिव्हलचे कार्यक्रम होणार आहेत. तेथील अपूर्ण कामे पूर्ण करावीत. या फेस्टिव्हलला महापालिकेने सहप्रायोजकत्व द्यावे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेने सर्व प्रभागांमध्ये पुणे फेस्टिव्हलसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87263 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..