शिवणे नदीपात्रात अवैध वाळू उपसा प्रकरणी धडक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवणे नदीपात्रात अवैध वाळू उपसा प्रकरणी धडक कारवाई
शिवणे नदीपात्रात अवैध वाळू उपसा प्रकरणी धडक कारवाई

शिवणे नदीपात्रात अवैध वाळू उपसा प्रकरणी धडक कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : शिवणे येथे नदीपात्रात जेसीबीने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात हवेली तहसीलदारांनी गुरुवारी (ता. ४) रात्री धडक कारवाई केली. वाळू माफियांकडून जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली.
शिवणे येथे नदीपात्रात गुरुवारी रात्री जेसीबी मशिन आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाळूची चोरी सुरू होती. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्याकडे तक्रार केली. ही माहिती मिळताच कोलते पाटील यांनी तातडीने रात्री भर पावसात धडक कारवाई करून वाळू चोरी करणारे एक जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
जेसीबी, ट्रॅक्टर ट्रॉली, चाळण यांच्यासह मुद्देमाल जप्त करून वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे, असे हवेली तहसीलदार कोलते पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87265 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..