पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांना दिलासा, आणखी १४ फेऱ्या वाढल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

14 rounds of Pune - Lonavala local have been increased
पुणे-लोणावळा लोकलच्या १४ फेऱ्या वाढल्या

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांना दिलासा, आणखी १४ फेऱ्या वाढल्या

पुणे - पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वे प्रशासनाने लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्या तीन टप्प्यांत वाढविल्या जाणार आहेत. सध्या या मार्गावर २६ फेऱ्या होत आहेत. आणखी १४ फेऱ्या वाढल्याने एकूण ४० फेऱ्या होतील. यामुळे प्रवाशांची मोठी मागणी पूर्ण झाली आहे.

रेल्वे प्रशासन तीन टप्प्यांत ही सेवा वाढवीत आहे. ८ ऑगस्ट रोजी ४, १५ ऑगस्ट रोजी ६ व २२ ऑगस्टला ४ लोकल धावणार आहे. ८ ऑगस्टला पुणे ते तळेगाव दरम्यान लोकलच्या ४ फेऱ्या वाढतील. यात पुण्याहून दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी सुटेल, ती तळेगावला ४ वाजून ३२ मिनिटांनी पोचेल. त्यानंतर पुण्याहून रात्री ९ वाजून २ मिनिटांनी निघेल. तळेगावला १० वाजून २२ मिनिटांनी पोचेल. तर तळेगावहून दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटून पुण्याला ५ वाजून ३२ मिनिटांनी पोचेल. तसेच लोणावळ्याहून रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि पुण्याला रात्री ११ वाजता पोचेल.

१५ ऑगस्टपासून ६ लोकल
पुणे ते लोणावळा दरम्यान क्रमांक ०१५८२ पुण्याहून रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटेल ती लोणावळा येथे रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी पोचेल. ०१५५२ क्रमांकाची लोकल पुण्याहून रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी निघेल, ती १ वाजून ५० मिनिटांनी लोणावळ्याला पोचेल. लोकल क्रमांक ०१५५४ पुण्याहून पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल व लोणावळा येथे सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी पोचेल.

०१५७९ क्रमांकाची लोकल लोणावळ्याहून रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी सुटेल पुण्याला रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पोचेल. ०१५८१ ही लोकल लोणावळ्याहून रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी सुटेल व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १ वाजून १७ मिनिटांनी पुण्याला पोचेल. २२ ऑगस्टपासून लोकलच्या चार फेऱ्या वाढणार आहेत. मात्र दुपारच्या चार फेऱ्या अद्याप सुरू न झाल्याने प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87272 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneLocal Trainlonavala