अपघाती मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना भरपाईचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघाती मृत्यू झालेल्याच्या
कुटुंबीयांना भरपाईचे आदेश
अपघाती मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना भरपाईचे आदेश

अपघाती मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना भरपाईचे आदेश

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : भरधाव आलेल्या जीपने धडक दिल्यामुळे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना ८० लाख सहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने दिला आहे. या रकमेवर दावा दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक सात टक्के व्याज देण्याचेही निकालात म्हटले आहे.

न्यायप्राधिकरणाचे सदस्य सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांनी याबाबत जून २०१७ साली ॲड. आशिष पटनी आणि ॲड. अनिल पटनी यांच्यामार्फत न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. यामध्ये ३२ वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्यावतीने २६ वर्षीय पत्नी, सहा वर्षाच्या दोन मुली आणि वृद्ध आई-वडिलांनी हा दावा दाखल केला होता. जीपचे मालक आणि विमा कंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिडेटच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. ॲड. पटनी यांनी उत्पन्न सिद्ध करण्यासाठी मयत नोकरदार काम करत असलेल्या कंपनी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष नोंदवली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87474 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..