आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे कासुर्डी गावात नूतनीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे कासुर्डी गावात नूतनीकरण
आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे कासुर्डी गावात नूतनीकरण

आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे कासुर्डी गावात नूतनीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) आणि एएफएमसीचे माजी विद्यार्थी डॉ. अरविंद लाल यांच्या एएलव्हीएल फाउंडेशनच्या वतीने दौंड तालुक्यातील कासुर्डी गावातील ‘ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रा’चे (आरएचटीसी) नूतनीकरण आणि प्राथमिक शाळेला सुविधांचा पुरवठा करण्यात आला. सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक सर्जन व्हाइस ॲडमिरल रजत दत्ता यांच्या उपस्थितीत नूतनीकरण केलेले हे आरएचटीसी नुकतेच सुरू करण्यात आले.
याप्रसंगी एएफएमसीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर रामसेथू, डॉ. अरविंद लाल, आमदार राहुल कुल तसेच इतर अधिकारी व आरोग्य सेवेतील कर्मचारी उपस्थित होते. एएफएमसीच्या ‘ग्रॅज्युएट विंग’च्या हीरक महोत्सवानिमित्त हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने एएफएमसीच्या माजी विद्यार्थी संघटनेने कासुर्डी गावात आरोग्य सेवेच्या सर्वांगीण वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या केंद्रात मल्टीस्पेशालिटी क्लिनिक, तपासणी, त्वरित सेवा, पिण्यायोग्य पाण्याच्या सुविधांचा समावेश आहे. यामुळे शालेय आरोग्य कार्यक्रमातही आता सुधारणा होतील. कासुर्डी गाव हे २००४ पासून एएफएमसीचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत आहे. या केंद्राद्वारे ग्रामस्थांना उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87623 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..