लाल किल्ल्यावरून ‘स्वदेशी सलामी’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाल किल्ल्यावरून ‘स्वदेशी सलामी’!
लाल किल्ल्यावरून ‘स्वदेशी सलामी’!

लाल किल्ल्यावरून ‘स्वदेशी सलामी’!

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा लाल किल्ल्यावरून स्वदेशी बनावटीच्या ‘अटॅग्स’ तोफांची सलामी दिली जाणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (एआरडीई) या प्रयोगशाळेद्वारे अटॅग्स तोफेची निर्मिती करण्यात आली आहे.
यंदा लाल किल्ल्यावर २१ तोफांची सलामी देण्यासाठी ब्रिटिश २५ पौंडी तोफांसोबत डीआरडीओने तयार केलेल्या स्वदेशी दोन अटॅग्स तोफांचा वापर केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या चाचण्यांमध्ये ‘अटॅग्स’ने आपली क्षमता सिद्ध केली असून सध्या गुणवत्ता आश्वासन महासंचालनालयाद्वारे (डीजीक्यूए) तोफेची मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे.
सैन्यदलातील जुन्या तोफांना आधुनिक १५५ एमएम तोफांनी बदलण्यासाठी डीआरडीओतर्फे ‘अटॅग्स’ निर्मिती प्रकल्पाची सुरवात २०१३ मध्ये करण्यात आली. या तोफा निर्मितीसाठी एआरडीई प्रयोगशाळेने भारत फोर्ज लिमिटेड आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड या दोन खासगी कंपन्यांशी करार केला. अटॅग्स ही तोफ ४८ किलोमीटर लांब पल्ल्याचे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे. जगातील इतर अशाच प्रकारच्या तोफांच्या तुलनेत ‘अटॅग्स’ची अचूकपणे मारा करण्याची क्षमता सर्वाधिक असून विविध हवामानाच्या परिस्थितीत अटॅग्सच्या क्षमतेची चाचण्या पार पडल्या आहेत.

‘अटॅग्स’ बाबत
- ही तोफ ४८.०७८ किलोमीटर लांबच्या पल्ल्याचे लक्ष्य भेदणारी
- सर्वात लांबच्या पल्ल्याचे लक्ष्य भेदणारी जगातील पहिली तोफ
- जलदगतीने स्थलांतर करणे शक्य
- रात्रीच्या वेळी ही डायरेक्ट-फायर मोड प्रणालीचा वापर शक्य
- स्वयंचलित निर्देश व नियंत्रण प्रणाली

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87633 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..