बहुतांश भाजीपाल्यांचे वाढलेले दर स्थिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहुतांश भाजीपाल्यांचे वाढलेले दर स्थिर
बहुतांश भाजीपाल्यांचे वाढलेले दर स्थिर

बहुतांश भाजीपाल्यांचे वाढलेले दर स्थिर

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. ७ : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. खरिपातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरळीत होत असल्याने आवकेत वाढ झाली आहे. यामुळे काही भाजीपाल्यांच्या दरात घट झाली असली तरी, बहुतांश भाजीपाल्यांचे वाढलेले दर स्थिर आहेत.

परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १२ टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून तीन टेम्पो शेवगा, कर्नाटकातून चार टेम्पो घेवडा आणि पाच ट्रक कोबी, बेळगाव धारवाड येथून सुमारे २५० गोणी मटार, इंदूर येथून गाजर आठ टेम्पो आवक झाली होती.
राज्याच्या विविध भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले ९०० पोती, टोमॅटो ११ हजार क्रेट, फ्लॅावर १४ तर कोबी चार टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे १०० पोती, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी पाच टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, मटार ३०० गोणी आवक झाली. कांदा ५० तर बटाटा सुमारे ३० ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची १५ ट्रक आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : १००-१४०, बटाटा : १८०-२२०, लसूण : ५०-४००, आले सातारी : १००-३००, भेंडी : ३००-५००, गवार : गावरान व सुरती ः ५००-७००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : ३००-४००, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी ः ३००-४००, पांढरी ः ३००-३५०, पापडी : ३००-४००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : २००-२५०, वांगी : ३००-४५०, डिंगरी : ३००-४००, नवलकोल : १४०-१५०, ढोबळी मिरची : ३५०-४५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-२००, शेवगा : ३००-५००, गाजर : २५०-३००, वालवर : ४००-४५०, बीट : ८०-१२०, घेवडा : ५००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : ६००-६५०, पावटा : ३५०-४००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दीड लाख तर मेथीची ५० हजार जुड्या आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ६००-१०००, शेपू : ६००-८००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००-६००, पुदीना : ३००-६००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ६००-८००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-६००, पालक : ६००-१०००.

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : १२०-२००, अ‍ॅष्टर : जुडी २०-३०, कापरी : ३०-४०, शेवंती : ६०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०, जर्बेरा : ५०-५०, कार्नेशियन : १५०-२००, मोगरा : ३००-६००.

फळबाजार
फळ बाजारात रविवारी लिंबाची सुमारे दीड हजार गोणी आवक झाली. मात्र, आवक कमी झाल्याने आणि पावसाळ्यातही मागणी असल्याने लिंबाच्या गोणी मागे १०० रुपये वाढ झाली तर डाळिंब ३० टन, मोसंबी ६० टन, संत्रा दोन टन, पपई १० टेम्पो, सीताफळ १० टन, पेरू ४०० क्रेटस, कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी तीन टेम्पो आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे...
लिंबे (गोणीस) ः ५००-७००, डाळिंब (किलो) गणेश- ५-३०, भगवा- ३०-१४०, आरक्ता- १०-५०, पपई प्रति किलो- २०-३५, पेरू (१० किलो)- २००-४००, सीताफळ- २०-१५०, कलिंगड- ८-१४, खरबूज- १०-१८.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87638 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..