एमपीएससी परीक्षेत विद्यार्थ्याकडून गैरप्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमपीएससी परीक्षेत विद्यार्थ्याकडून गैरप्रकार
एमपीएससी परीक्षेत विद्यार्थ्याकडून गैरप्रकार

एमपीएससी परीक्षेत विद्यार्थ्याकडून गैरप्रकार

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१, सहा जिल्हा केंद्रांवर शनिवारी घेण्यात आली. या परीक्षेच्या संयुक्त पेपर एकच्या परीक्षेत एक उमेदवार गैरप्रकार करताना आढळला. यावर एमपीएससीने कारवाईचा बडगा उगारत गुन्हा दाखल केला आहे.
एमपीएससीच्या दक्षता पथकाला तपासणी दरम्यान पुणे जिल्हा केंद्रावरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे (वय ३०, रा. औरंगाबाद) या विद्यार्थ्याकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपविलेले मोबाईल फोन आणि ब्लूटूथ इअर फोन आदी साहित्य सापडले. त्यानुसार एमपीएससीच्या नियमानुसार गुसींगे याच्यावर कारवाई केली. याप्रकरणी केंद्र प्रमुख संतोष बाळासाहेब ताम्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्याकडे सापडलेल्या एका काळ्या रबरमध्ये लॅमिनेशन केलेले चौकोनी इलेक्ट्रानिक्स डिव्हाईस होते. त्यात दोन मोबाईल सिमकार्ड स्लॉट होते. त्यामध्ये दोन सिम होते. अधिक तपासणी केली असता, त्याच्याकडे एक मोबाईल, पॅन्टच्या खिशात एक ब्ल्युटुथ मायक्रो स्पीकर व दोन मायक्रो सेल सापडले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87643 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..