स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अभिजात नाट्य महोत्सव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अभिजात नाट्य महोत्सव’
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अभिजात नाट्य महोत्सव’

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अभिजात नाट्य महोत्सव’

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘अभिजात’ नाट्य संस्थेतर्फे ‘अभिजात नाट्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत मंगळवारी (ता. ९) मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यमंदिरात सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत, तर शनिवारी (ता. १३) रात्री ११.५० ते स्वातंत्र्य दिनाच्या (ता. १५) रात्री बाराच्या ठोक्यापर्यंत पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात नाट्यजागर होणार आहे.
या महोत्सवात ‘टिळक आणि आगरकर’, ‘वासूची सासू’ आणि ‘होय मी सावरकर बोलतोय’ या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. या नाटकांसाठीची तिकीट विक्री दोन्ही नाट्यगृहांमध्ये सुरू झाली. प्रत्येक नाटकाची स्वतंत्र तिकिटे आणि पूर्णोत्सव तिकिटेही उपलब्ध आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने अभिनेते आकाश भडसावळे सलग सहा प्रयोगांचा विक्रम करणार आहेत.
लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर भाष्य करणारे ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक आहे. या नाटकात नयना आपटे, सुनिल जोशी, आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे, गायत्री दीक्षित, प्राची सहस्त्रबुद्धे मुख्य भूमिकेत आहेत. ‘वासूची सासू’ हे प्रदीप दळवी लिखित व दुर्गेश मोहन दिग्दर्शित विनोदी नाटक आहे. अभिजित केळकर, परमेश्वर गुट्टे, आकाश भडसावळे, संजना पाटील, अथर्व गोखले, आशा ज्ञाते या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राजकीय जीवनावर आधारित ‘होय मी सावरकर बोलतोय’ हे नाटक आहे. या नाटकात आकाश भडसावळे, बहार भिडे, दुर्गेश आकेरकर, कविता विभावरी, शैलेश चव्हाण प्रमुख भूमिकेत आहेत. नाटकाचे लेखन अनंत ओगले यांनी केले असून सुनील जोशी यांचे दिग्दर्शन आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87713 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..