Maharashtra Weahter : पुण्यात रेड तर मुंबईत ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Weather update Red alert in Pune and Orange alert in Mumbai
पावसाचा जोर राहणार कायम

Maharashtra Weahter : पुण्यात रेड तर मुंबईत ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या अंदाज

पुणे : मॉन्सूनच्या पावसाने पुन्हा राज्यात दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळत असून रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला. राज्यात पावसाची स्थिती पुढील चार दिवस अशीच कायम राहणार असून सोमवारी (त. ८) कोकण व मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. एकीकडे मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हा दक्षिणेकडे कायम असून दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

त्यातच वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाची तीव्रता पुढील २४ तासांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मॉन्सून सक्रिय होत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. येत्या गुरुवारपर्यंत (ता. ११) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक भागात मुसळधार ते जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह काही भागात जोरदार सरींनी हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकोणात मुसळधार सरी पडत असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे.

सर्वाधिक पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे २७० मिलिमीटर आणि कणकवलीत २१८ मिलिमीटर इतकी झाली. सोमवारी (ता. ८) रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे ही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

या जिल्ह्यांत अलर्ट
रेड अलर्ट ः रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर
येलो अलर्ट : नाशिक, परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, भंडारा

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87757 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..