पोपटाच्या शिट्टीमुळे शेजाऱ्यांमध्ये भांडण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोपटाच्या शिट्टीमुळे शेजाऱ्यांमध्ये भांडण
पोपटाच्या शिट्टीमुळे शेजाऱ्यांमध्ये भांडण

पोपटाच्या शिट्टीमुळे शेजाऱ्यांमध्ये भांडण

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः एखाद्याच्या पोपटाने तुमच्याकडे पाहून शिट्टी वाजविली तर तुम्ही काय कराल? तर तुम्हीही तितक्‍याच आनंदाने त्याला ‘काय रे मिठू’ म्हणून प्रतिसाद द्याल ना. पण शिवाजीनगरमध्ये मात्र पोपट सारखाच शिट्ट्या वाजवितो म्हणून एका नागरिकाने शेजाऱ्यला जाब विचारला. तेव्हा दोन्ही शेजाऱ्यांमध्ये पोपटाच्या शिट्टीवरून जोरदार शिवीगाळ झाली, थेट मारण्याची धमकी देण्यात आली. पोपटाचे हे प्रकरण इथेच थांबले नाही, तर थेट पोलिस ठाण्यात पोचले, पोलिसही चक्रावले, अखेर तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करून पोपटाच्या शिट्टीच्या प्रकरणावर पडदा टाकला !
याप्रकरणी ७२ वर्षीय नागरिकाने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यावरून पोपटाच्या मालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या घरासमोर एक व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. दरम्यान, त्यांच्याकडे एक पोपट आहे. तो पोपट सतत शिट्टी वाजवितो, ओरडत असतो. त्याचा ज्येष्ठ नागरिक तक्रारदाराला त्रास होत होता. या प्रकाराला कंटाळून ते शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोपटाच्या मालकाकडे गेले. त्यांना ‘तुमचा पोपट सारखा ओरडत असतो, तुमच्या पोपटाला दुसरीकडे कुठेतरी नेऊन ठेवा,’ असे म्हणाले. पोपटाच्या मालकाला तक्रारदाराचा राग आला. त्यांनी तक्रारदारास शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांचे भांडण तेवढ्यापुरतेच थांबले नाही. तर पोपटाच्या मालकाने त्यांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पोपटाच्या शिट्टीचे, ओरडण्याचे भांडण इथेच थांबले नाही, तर थेट खडकी पोलिस ठाण्यातही पोचले. तक्रारदार यांनी खडकी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला. असा प्रकार पहिल्यांदाच अनुभवण्यास आला असल्याने पोलिसही चांगलेच चक्रावले. मात्र तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असल्याने पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली. त्यानंतर पोपटाच्या मालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्यास समज दिली.

पोपट सतत ओरडत असल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोपटाच्या मालकाविरुद्ध ‘एनसी’ दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
- दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खडकी पोलिस ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87761 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..