राकेश सणस यांना बाबा आमटे पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राकेश सणस यांना बाबा आमटे पुरस्कार जाहीर
राकेश सणस यांना बाबा आमटे पुरस्कार जाहीर

राकेश सणस यांना बाबा आमटे पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः इन्स्पायरर्स ट्राइब प्रकाशवाटा फाउंडेशन या संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘प्रेरणास्थान थोर समाजसेवक बाबा आमटे पुरस्कार’ यंदा विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या उमेद फाउंडेशनचे संस्थापक राकेश सणस यांना जाहीर झाला आहे. रोख ५० हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती इन्स्पायरर्स ट्राइब प्रकाशवाटा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश चाफेकर आणि उपाध्यक्ष विपुल बाणे यांनी दिली. सोमवारी (ता. १५) दुपारी चार वाजता कोथरूड येथील अंबर हॉल येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभिजित सोनावणे उपस्थित राहणार आहेत.

शशिकांत भोसले यांना गुरू गौरव’ पुरस्कार जाहीर
पुणे, ता. ७ ः ‘आर्ट बिट्स फाउंडेशन, पुणे’तर्फे देण्यात येणारा गुरू गौरव’ पुरस्कार ज्येष्ठ पखवाज वादक शशिकांत भोसले यांना जाहीर झाला आहे. कला क्षेत्रात नवोदित कलाकार घडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आणि त्यांना प्रशिक्षण-प्रोत्साहन देणाऱ्या ज्येष्ठ व अनुभवी गुरूंना हा पुरस्कार देण्यात येतो. एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा या पुरस्कारासाठी भोसले यांची निवड करण्यात आली आहे. भोसले यांच्या नावावर सलग १२५ तास पखवाज वादनाचा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.

‘इक्वल’ प्रदर्शनाचे उद्यापासून आयोजन
पुणे, ता. ७ ः अजय चांडक यांच्यातर्फे मंगळवारपासून (ता. ९) ‘इक्वल’ या सामूहिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राममध्ये आयोजित हे प्रदर्शन १५ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांसाठी खुले असणार आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये आगाचार्य, अजय चांडक, अमित पिठाडिया, चेतन वैती, गौतम मुखर्जी, मधुमिता भट्टाचार्य, मीनाक्षी झा बॅनर्जी, मुक्ता गुप्ता, नीना सिंग, पल्लवी पंडित, पार्थ भट्टाचार्य, प्रिन्कल मेहता, सचिन निंबाळकर, समीक डे, संजीव सकपाळ, शालिनी गुप्ता, सुब्रतो दास, सुजित गिरम, स्वपन रॉय या कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87763 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..