दारू पिताना वाद; एकाचा दगडाने मारहाण करून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू पिताना वाद; एकाचा दगडाने मारहाण करून खून
दारू पिताना वाद; एकाचा दगडाने मारहाण करून खून

दारू पिताना वाद; एकाचा दगडाने मारहाण करून खून

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः दारू पिताना झालेल्या वादातून एकाने मित्राला दगडाने जबर मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक झाली आहे. प्रवीण नामदेव नाईक (वय ४१) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अनिल राजू सासी (वय ३३, रा. हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय राजू सासी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना मंगळवारी (ता. २) घडली आहे. अनिल सासी व प्रवीण नाईक हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. नेहमीप्रमाणे दोघेजण मंगळवारी दुपारी दारू पिण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी दारू पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी प्रवीणने रागाच्या भरात अनिलच्या डोळ्याच्या बाजूला व कपाळावर दगडाने मारहाण केली. या घटनेत अनिल गंभीर जखमी झाला. त्यास उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे अनिलवर उपचार सुरू असताना रविवारी (ता. ७) त्याचा मृत्यू झाला.