अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल
अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील ४९ लाख ६३ हजार घरांवर तिरंगा ध्वज लावला जाणार आहे. यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून, संपूर्ण विभागामध्ये तिरंगा ध्वजाची उपलब्धता करून दिली आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

मागील तीन महिन्यांपासून ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. शासन स्तरावरून यासंदर्भात बैठका घेण्यात येत आहेत. केंद्र सरकारने सामान्य नागरिकांनासुद्धा झेंडा लावण्याचा अधिकार दिला आहे. या उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान स्वराज्य महोत्सवांतर्गत विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सर्व घरांवर झेंडा लावण्याचे नियोजन आहे. ग्रामविकास विभाग, पालिका विभाग आणि महसूल विभाग हे विभाग त्या-त्या स्तरावर नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केल्या आहेत. पालिका हद्दीमध्ये क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत झेंडा वाटप आणि वितरणाचे नियोजन केले आहे, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावरून याचे नियोजन करण्यात येत आहे.

विभागात ४९ लाख ६३ हजार झेंड्यांची मागणी असून, यातील ४० लाख ७२ हजार झेंडे उपलब्ध झाले आहेत. केंद्र सरकारकडे १३ लाख झेंड्यांची मागणी केली असून, यातील १० लाख ९६ हजार झेंडे उपलब्ध झाले आहेत. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे झेंडे वाटपासाठी दिले आहेत, अशी माहिती राव यांनी दिली. तसेच ग्रामपंचायती ग्राम निधीतून तिरंगा ध्वज खरेदी करून वितरित करू शकतात, तर पालिका हद्दीत स्वनिधीतून टेंडरद्वारे पुरवठादार निश्‍चित करून तिरंगा खरेदी करू शकतात, अशी माहिती राव यांनी दिली. याशिवाय विभागातील जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक एक, असे ७५ फूट उंचीचे झेंड उभारण्यात येणार आहेत. या शिवाय पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, वारसास्थळ वॉक, मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम होणार आहेत, असेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88155 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..