राष्ट्रवादीचे ‘महाराष्ट्र छोडो राज्यपाल’ आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे ‘महाराष्ट्र छोडो राज्यपाल’ आंदोलन
राष्ट्रवादीचे ‘महाराष्ट्र छोडो राज्यपाल’ आंदोलन

राष्ट्रवादीचे ‘महाराष्ट्र छोडो राज्यपाल’ आंदोलन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ९ : महाराष्ट्र व महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल वारंवार चुकीची वक्तव्ये करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केवळ माफी मागून चालणार नाही. तर त्यांनी महाराष्ट्र सोडून जावे,’ अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली. राज्यपाल कोश्‍यारी यांच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्र छोडो राज्यपाल’ आंदोलन करण्यात आले.

आंदोलनावेळी राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विद्या चव्हाण यांच्याकडून करण्यात आली. या वेळी शहराध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्यासह माजी आमदार जयदेव गायकवाड, विभागीय अध्यक्ष वैशाली महिला शहराध्यक्षा, मृणालिनी मदन वाणी, वैशाली नागवडे, जिल्हाध्यक्ष भरती शेवाळे, दीपाली धुमाळ, रुपाली ठोंबरे, कविता आल्हाट, किशोर कांबळे, प्रदीप देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88333 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..