कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्यावा ः डॉ. कानडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मवीर भाऊराव पाटील यांना
भारतरत्न द्यावा ः डॉ. कानडे
कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्यावा ः डॉ. कानडे

कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्यावा ः डॉ. कानडे

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अद्वितीय कार्यामुळे आज शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात वाहत आहे. त्यातून लाखो मुलांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्वल केले. शिक्षणाची शिदोरी सामान्यांना उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांना भारतरत्न द्यावा’, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी नुकतेच केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातर्फे आयोजित नवव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, शंकर आथरे, स्वागताध्यक्ष बाळासाहेब बेंडे, निमंत्रक बाळासाहेब गार्डी आदी उपस्थित होते. शंकर आथरे लिखित ‘काव्यांचल’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. गुजरात येथील कवी शिवानुज यांना ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88349 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..