कीर्ती महिला बचत गटाची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कीर्ती महिला बचत गटाची बाजी
कीर्ती महिला बचत गटाची बाजी

कीर्ती महिला बचत गटाची बाजी

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे आयोजित उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धेत रास्ता पेठेतील कीर्ती महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकाविला. कोथरूड येथील मुक्ती महिला बचत गटाने द्वितीय, तर कर्वेनगर येथीस सह्याद्री महिला बचत गटाने तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते विजेत्या महिला बचत गटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, संगीतकार सलील कुलकर्णी, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, स्पर्धाप्रमुख सारिका निंबाळकर, परीक्षक जुई पटवर्धन आदी उपस्थित होते.


हर्ष श्रावणी- कोथरूड, अन्नपूर्णा-कसबा, कुलस्वामिनी-वढू, महालक्ष्मी- गुजरात कॉलनी, शिवगृहिणी- जुनी सांगवी, माहूरगड- कात्रज कोंढवा, स्वामिनी- येरवडा या बचतगटांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. लकी ड्रॉ अंतर्गत टीव्ही, फ्रिजसह विविध पारितोषिके देण्यात आली. सुनिता पंडित, प्रमिला जाधव, मनिषा शिंदे, चारू चिकणे, शारदा यादव हे यंदाचे एक ते पाच क्रमांकाचे विजेते ठरले. सर्व सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88350 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..