विश्वेश्वर सहकारी बँकेत सेवक वेतन करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्वेश्वर सहकारी बँकेत सेवक वेतन करार
विश्वेश्वर सहकारी बँकेत सेवक वेतन करार

विश्वेश्वर सहकारी बँकेत सेवक वेतन करार

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर व बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यातील दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड व विश्वेश्वर बँक सेवक संघ, पुणे यांच्यामध्ये सेवक वेतन करार करण्यात आला आहे. कराराचा कालावधी १ जुलै २०२२ ते ३० जून २०२५ असा तीन वर्षांचा आहे. करारामुळे सेवकांना श्रेणीनुसार किमान रुपये ११०० ते कमाल १३ हजार रुपये मासिक वेतनवाढ मिळणार असून सवलतीच्या दराने कर्ज व रजा आदी सुविधा मिळणार आहेत.

करारावर बँकेच्या वतीने अनिल गाडवे (अध्यक्ष), सीए मनोज साखरे (उपाध्यक्ष) संचालक सुनील रुकारी, अमोल मणियार, राजेंद्र मिरजे, अतुल रुकारी, अॅड. पुरुषोत्तम लांडगे, श्रीराम आपटे (मुख्य कार्यकारी अधिकारी) व राम दराडे (सरव्यवस्थापक) यांनी तर सेवक संघटनेच्या वतीने सोमनाथ वाडेकर (अध्यक्ष), बापूसाहेब गिरमे (सरचिटणीस), अमित सोळसे, ओमकार वीरकर व कार्यकारिणीच्या अन्य सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88364 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..