‘गावोगावी क्रांतिकारकांची चित्र प्रदर्शने व्हावीत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गावोगावी क्रांतिकारकांची चित्र प्रदर्शने व्हावीत’
‘गावोगावी क्रांतिकारकांची चित्र प्रदर्शने व्हावीत’

‘गावोगावी क्रांतिकारकांची चित्र प्रदर्शने व्हावीत’

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः राष्ट्रभक्तीचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवला पाहिजे, इतिहासाचा वारसा जपणे हे आपले कर्तव्य आहे. क्रांतिकारकांची दुर्मिळ छायाचित्रे गावोगावी प्रदर्शित व्हावी, असे मत पर्यावरणप्रेमी स्वयंप्रभादेवी मोहिते- पाटील यांनी व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वयंप्रभादेवी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, ट्रस्टच्या विश्वस्त ॲड. नंदिनी शहासने, स्वातंत्र्यसेनानी वसंत प्रसादे, डॉ. निशिकांत तांबट, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. मोहन शेटे, साहित्यिक प्रा. श्याम भुर्के, प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, उद्योजक संतोष मांढरे आदी उपस्थित होते.

राजा रविवर्मा चित्र प्रदर्शनी, घोले रस्ता, शिवाजीनगर येथे क्रांतिकारकांच्या सुमारे बाराशे छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन १० व ११ ऑगस्ट रोजी दररोज सकाळी सात ते सायंकाळी दहा या कालावधीत सर्वांसाठी खुले असणार आहे. स्वातंत्र्यसेनानी प्रसादे यांनी ‘दादरा नगर हवेली स्वातंत्र्य लढा गनिमी काव्याने कसा जिंकला’ याचे वर्णन केले, तर डॉ. तांबट यांचे वडील दत्ताजी तांबट यांनी शनिवार वाड्यावर झेंडा फडकावला होता, याची आठवण सांगितली.
-

PNE22S83456

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88380 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..