‘हायकूमध्ये जीवनविषयक तत्तवज्ञान देण्याचे सामर्थ्य’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हायकूमध्ये जीवनविषयक तत्तवज्ञान देण्याचे सामर्थ्य’
‘हायकूमध्ये जीवनविषयक तत्तवज्ञान देण्याचे सामर्थ्य’

‘हायकूमध्ये जीवनविषयक तत्तवज्ञान देण्याचे सामर्थ्य’

sakal_logo
By

‘हायकूमध्ये जीवनविषयक
तत्त्वज्ञान देण्याचे सामर्थ्य’

पुणे ः ‘‘हायकूमध्ये हायकूकारांच्या जीवनमूल्यांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. हायकूच्या अवघ्या सतरा अक्षरांमध्ये सभोवतालच्या विश्वाचा वेध घेऊन समाजाला जीवनविषयक तत्त्वज्ञान देण्याचे सामर्थ्य असते’’, असे मत हायकूकार डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी व्यक्त केले. हायकू इंटरनॅशनल संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या पहिल्या बाशो इंटरनॅशनल हायकू संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात देशातील ६० हायकूकारांनी सहभाग घेतला. या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक कांचन प्रकाश संगीत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी डॉ. घाणेकर संपादित डहाळी हायकू विशेषांकाचे प्रकाशन केले. संस्थाध्यक्ष योगिता पाखले यांना ‘बाशो इंटरनॅशनल ॲवॉर्ड’, युवा साहित्यिक तेजस्विनी सोनगिरे यांना ‘मधुरंग युवा इंटरनॅशनल ॲवॉर्ड’ तर कांचन संगीत व तुकाराम खिल्लारे यांना विशेष हायकू इंटरनॅशनल ॲवॉर्ड प्रदान केला.

रवींद्र कोहकडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन
पुणे ः ‘‘भारत केवळ डाव्यांचा नाही, केवळ उजव्यांचाही नाही. भारताचा नकाशा हा उजव्या-डाव्या विचारांनी एकरूप आहे’, असे मत ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस यांनी नुकतेच व्यक्त केले. रवींद्र कोहकडे लिखित आणि वेदांत प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘अमूल्य बलिदानाची आणि त्यागाची स्फूर्तिगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड’ संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख, तसेच उमाकांत पिंगळे, सुभाष वाणी आदी उपस्थित होते. या पुस्तकाच्या विक्रीतून जमा होणारा निधी ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड’ या संस्थेच्या विविध प्रकल्पांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती कोहकडे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खैरे यांनी केले. तन्वी कोल्हे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88416 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..