ब्रूक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रूक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष कार्यक्रम
ब्रूक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष कार्यक्रम

ब्रूक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : प्रख्यात नाट्य-चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रूक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे येत्या रविवारी (ता. १४) व सोमवारी (ता. १५) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंच येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती सेंटरच्या मानद सचिव शुभांगी दामले यांनी दिली.

याअंतर्गत रविवारी (ता. १४) दुपारी तीन वाजता ‘महाभारत-संगीतातील प्रयोग’ या विषयावर डॉ. चैतन्य कुंटे, दुपारी ४.३० वाजता ‘पीटर ब्रूक यांची रंगदृष्टी आणि अभिनय विचार’ या विषयावर डॉ. प्रवीण भोळे आणि सायंकाळी ६.३० वाजता ‘महाभारत : नाटक ते चित्रपट : सृष्टी व दृष्टी’ या विषयावर प्रा. समर नखाते यांचे व्याख्यान होणार आहे. तर, सोमवारी (ता. १५) पीटर ब्रूक दिग्दर्शित ‘द महाभारत’ हा चित्रपट दुपारी १ ते ४.३० व सायंकाळी ५ ते ६.४५ या दोन टप्प्यांत दाखवण्यात येणार आहे. कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून, यासाठी पूर्वनोंदणी मात्र आवश्यक आहे. नोंदणीसाठी ९८५०८३९९१७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दामले यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88435 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..