फसवणूक प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्यासह पतीविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्यासह पतीविरुद्ध गुन्हा
फसवणूक प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्यासह पतीविरुद्ध गुन्हा

फसवणूक प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्यासह पतीविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास २० टक्के जादा नफा देण्याचे आमिष दाखवून महिला पोलिस कर्मचारी व त्यांच्या पतीने एका व्यावसायिकाची १९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलिस कर्मचाऱ्यासह त्यांचा पती शंकर लक्ष्मण गायकवाड (वय ५४, रा. रास्ता पेठ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सदाशिव राजाराम नलावडे (वय ५२, रा.रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नलावडे यांचा चारचाकी गाड्या दुरुस्तीचा व्यवसाय आहे.संबंधित महिला पोलिस कर्मचारी पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहे. तर त्यांचा पती शंकर गायकवाड याचा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. शंकर गायकवाड हा फिर्यादीकडे नेहमी त्याच्या गाड्या दुरुस्तीसाठी जात होता. गायकवाड दाम्पत्याने फिर्यादी नलावडे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना त्यांच्या टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणुकीपोटी कमी कालावधीत २० टक्के जादा मोबदला देऊ, असे सांगितले होते. त्यानंतर १९ लाख ५० हजार रुपये फेब्रुवारी २०२२ पर्यंत दिले. मात्र ठरल्याप्रमाणे घडले नाही. त्यानंतर गायकवाड दाम्पत्याने फिर्यादीस धनादेश दिले, मात्र हे वटले नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88488 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..