‘एआय’ आधारित ई-वाहनाची बॅटरी; रिमोटच्या साहाय्याने सुरू-बंद करता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AI based e-vehicle battery
‘एआय’ आधारित ई-वाहनाची बॅटरी रिमोटच्या साहाय्याने सुरू-बंद करता येणार; पुण्यातील ‘आयओआरडी’चे संशोधन

‘एआय’ आधारित ई-वाहनाची बॅटरी; रिमोटच्या साहाय्याने सुरू-बंद करता येणार

पुणे : ई-दुचाकी व तीनचाकी वाहनाची बॅटरी किती शिल्लक राहिली आहे. ती कधी संपेल, त्याचं तापमान वाढलं आहे का?, ते कमी करायचं आहे. इतकंच काय जर आपले वाहन चोरीला गेले तर तत्काळ त्याची बॅटरी बंद करायची हे सारं आता शक्य होणार आहे. कारण तसा दावाच पुण्यातील इंफिनाईट ऑरबिट रिसर्च आणि डेव्हलपमेंट (आयओआरडी) या ई वाहन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थेने केला आहे. यासाठी पहिल्यादांच बॅटरी मध्ये ‘एआय’ चा वापर केला आहे. तसेच अन्य बॅटरींप्रमाणे या बॅटरीला चार्ज करण्याचीही गरज भासणार नाही. बॅटरी संपल्यानंतर मात्र बॅटरी बदलावी लागेल. एका बॅटरीचे आयुष्य हे तब्बल १५ वर्षे असणार असल्याची माहिती ‘आयओआरडी’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ अशोक सुद्रिक यांनी सांगितले.

ई वाहनांच्या किमती व त्यांना असणाऱ्या मर्यादा यामुळे भारतात मर्यादित स्वरूपात ई वाहनांची विक्री होत आहे. हे लक्षात घेऊन ‘आयओआरडी’ने नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ११ दुचाकी व २४ रिक्षां मध्ये ही बॅटरी बसवून त्याची टेस्ट घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. ‘सीआयआरटी’कडे देखील याच्या टेस्टिंगचे काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत ही बॅटरी उपलब्ध होईल. मात्र ती थेट वाहनांच्या उत्पादकाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सुद्रिक यांनी सांगितले. या वेळी संस्थेचे ऑपरेशन हेड डॉ. श्रीकांत पाटणकर, मुख्य वित्त अधिकारी अविनाश साळुंखे आदी उपस्थित होते.

संशोधनातून काय साध्य झालं
- ई वाहनाच्या बॅटरीचे तापमान ५३ डिग्रीपर्यंतदेखील चालेल. आता ३३ डिग्रीच्या पुढे गेल्यावर गाड्यांना आग लागण्याची घटना घडते.
- बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ व विजेवरील खर्च वाचेल.
- ‘एआय’चा वापर झाल्याने रिमोटद्वारे बॅटरी सुरू, बंद करणे, वाढलेलं तापमान नियंत्रणात आणणे शक्य होईल.
- एकच प्रकारची बॅटरी असल्याने सर्व वाहनांसाठी हे लागू होईल. वेगळ्या चार्जरची गरज भासणार नाही.
- प्रवासाचा खर्च खूपच कमी. ६० पैसे ते १ रुपये १० पैसे इतका प्रति किलोमीटरचा खर्च. आताच्या ई वाहनांना प्रती किलोमीटरसाठी ३ रुपये ५७ पैसे इतका खर्च येतो.
- बॅटरी संपण्यापूर्वी ३० किमी पूर्वी वाहनधारकांना ॲपवर मेसेज येईल. तेव्हा वाहनधारकांना बॅटरी बदलून घ्यावी लागेल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88547 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..