सांस्कृतिक विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांस्कृतिक विकास
सांस्कृतिक विकास

सांस्कृतिक विकास

sakal_logo
By

सेक्टर - सांस्कृतिक विकास (फायल नंबर----------८८११३)-----सूचना---- लेख पूर्ण आहे------


परंपरांतून समृद्धीकडे...

लीड----------------------राष्ट्राच्या प्रतिकूल विकासाच्या मार्गाने राष्ट्राची हानी होऊ शकते, असे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववाद मांडताना म्हटले आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर विद्वानांनी पाश्चात्त्य राजनीती, त्यांची जीवनमूल्ये या गोष्टींना आधुनिक समजून स्वीकारण्याचा निर्णय केला. भौतिक ज्ञानाबरोबरच अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आधुनिक व प्रगत मानली गेली आणि ती आपण स्वीकारली गेली. मात्र, त्यामुळे एका चुकीच्या दिशेने आपल्या देशाच्या प्रगतीचा, विकासाचा मार्ग निश्चित झाला. मानवाचे स्वरूप केवळ आर्थिक मानव कसे असू शकेल? मनुष्याचा संपूर्ण विकास हा त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास असला पाहिजे. आधुनिक व्यवस्थेमध्ये हे होऊ शकत नाही, येथे स्पर्धा केंद्रस्थानी आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक व्यक्ती असमाधानी असणेच या विकासाच्या मार्गाला मान्य आहे. थोडक्यात, सध्याच्या विकासाचे परिमाण माणसाला केवळ एक उपभोग घेणारा पंचेंद्रियांच्या मालक समजते. माणसाला सुखी करायचे म्हणजे त्याच्या भौतिक गरजा पूर्ण करायच्या, त्याच्या मनात नव्या गरजा निर्माण करायच्या आणि त्यासाठी उत्पादन-जाहिरात-बाजारपेठ अशी साखळी निर्माण करायची, असे आज मानले जाते. या विकासाने काय साधले?


कोट
विकासाचे केंद्र, माणूस!
विकासाच्या या कार्यकलापात केंद्रबिंदू आहे माणूस! मात्र, नवीन श्रम कसे कमी होतील, यासाठी विविधांगी संशोधन झाले. जग एक मोठी बाजारपेठच होऊन गेले. त्यात निसर्गाचा मूलभूत घटक असलेल्या सजीव प्राण्यांना कच्चा माल समजून त्यांना वस्तूचे मूल्य दिले गेले. राज्यव्यवस्थेने यासाठीच राबावे, असे ही विकासनीती मानते. मात्र, या प्रगतीला अंत नाही. विकासाच्या या आधुनिक सिद्धांताला जडवादी सिद्धांत, असे देखील म्हणता येईल. निसर्गावर मात करून, निसर्गाचा वापर करून मनुष्याने आपल्याला हव्या तशा सुविधा निर्माण केल्या. या विकासनीतीमध्ये काही लोक अत्यंत श्रीमंत होतात, तर काही दरिद्री होत. यातून वाढते शहरीकरण ही एक दुसरी समस्या आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ आणि पर्यावरणाचे असंतुलन निर्माण होते. विकासासाठी ऊर्जेचा प्रचंड वापर होतो. विकासाच्या या युगात मनुष्य सुखी-समाधानी स्वस्थ झाला आहे का? ज्या पृथ्वीच्या साह्याने तो सर्व उपभोग घेतो, ती वसुंधरा निर्मळ, जननक्षम राहिली आहे का? समृद्धीमधून काय मिळवले माणसाने?
- डॉ. रमा दत्तात्रेय गर्गे, कोल्हापूर

जगण्याची भारतीय परंपरा
१. लवकर झोपणे आणि पहाटे लवकर उठणे हा दिनक्रम शारिरिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक असतो. त्यामुळे शरीर आणि मनाला पुरेशी विश्रांती मिळते, तसेच पहाटेच्या शांत, पवित्र वातावरणामध्ये साधना, ध्यानधारणा यासाठी अनुकूल वातावरण मिळते. मात्र, अनेकजण मोबाईल किंवा अन्य कारणांमुळे उशिरा झोपतात. त्यामुळे उशिरा उठणे, पुरेशी झोप न मिळणे इत्यादी समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे असा दिनक्रम पुन्हा सुरु करावा का?

२. दररोज सकाळी अथवा संध्याकाळी नामस्मरण, स्तोत्रपठण, प्रार्थना ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य जपले जाते व कुटुंबात देखील खेळीमेळीचे, मंगलमय वातावरण निर्माण होते. मात्र, सध्या हे चित्र दुर्मिळ झाले आहे. परिणामी कुटुंबात अनेक प्रकारे वेगळे वातावरण दिसून येते. यासाठी पुन्हा एकदा घरामध्ये एकत्रित नामस्मरण, स्तोत्रपठण, प्रार्थना सुरू करावी का?

३. शेतीची कामे, मैदानी खेळ, दळणे, कांडणे, कपडे धुणे या माध्यमातून शरीराचा योग्य वयात पुरेसा व्यायाम होत असे. त्यामुळे शरीराची व्यवस्थित वाढ होणे, शरीर सशक्त होणे असे फायदे मिळत. मात्र, सध्या टीव्ही, मोबाईल, संगणक यांचा वापर
वाढल्यामुळे तसेच फ्रिज, वॉशिंग मशिन इत्यादी घरगुती उपकरणांमुळे पुरेसा व्यायाम होत नाही. त्यामुळे या यंत्रांचा वापर मर्यादित करावा का?

४. घरामध्ये औषधी वनस्पतींपासून बनवलेला धूप, तिळाचे तेल किंवा देशी गायीचे तूप यांचा दिवा दररोज लावणे ही आपली परंपरा आहे. यामुळे वातावरण प्रसन्न राहून आरोग्यही जपण्यास मदत व्हायची. सध्या वापरल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त रूम फ्रेशनरऐवजी पुन्हा एकदा धूप, दीप यांचा वापर करावा का?

५. घरामध्ये बनविण्यात आलेले, ताजे पौष्टिक अन्नाचे सेवन आपल्या संस्कृतीत पूर्वापार चालत आले आहे. हल्ली अनेक ठिकाणी पॅकबंद, खूप दिवसांपूर्वी बनवलेल्या अन्नपदार्थांचा खाण्यासाठी वापर होतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. आपण पुन्हा एकदा घरगुती, ताजे, पौष्टिक अन्न खाण्यास प्राधान्य द्यावे का?

६. मोजक्याच वस्तू बाळगणे, भौतिक सुखांच्या मागे न धावणे, केवळ गरजेच्या वस्तूंची खरेदी करणे ही आपली परंपरा आहे. पाश्‍चिमात्य संस्कृती बरोबर या उलट सांगते. मात्र, आपण हल्ली अनेकदा गरज नसताना मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. त्यामुळे घराच्या आर्थिक व्यवस्थापनावर ताण येतो, तसेच घरातील जागेचा अपव्यय, जुन्या चांगल्या वस्तू टाकून देणे असे प्रकारही दिसून येतात. त्यातून पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे पुन्हा एकदा मोजक्याच वस्तू खरेदी करण्याचे ठरवावे का?

७. वाहन ही गरज असली तरी घराजवळच्या चौकात भाजी आणायला जाताना गाडी वापरणे खरेच गरजेचे असते का? प्रदूषण कमी करण्यासाठी माझे योगदान म्हणून जवळच्या कामासाठी मी वाहन वापरणार नाही असा निर्णय घेता येईल का?

८. वाडा संस्कृतीमध्ये अनेक कुटुंबांचा एकमेकांशी कौटुंबिक जिव्हाळा, अनौपचारिक नाते होते, जे फ्लॅट संस्कृतीमध्ये लोप पावताना दिसते आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या कुटुंबांची सुखदुःखे समजत नाहीत. आपण पुन्हा एकदा स्वतः पुढाकार घेऊन आपल्या शेजाऱ्यांशी कौटुंबिक नाते जोडण्यासाठी प्रयत्न करावेत का?

९. वृद्धाश्रमात राहणारे आजी-आजोबा आणि पाळणाघरातली लहान बाळे ही कौटुंबिक आनंदापासून पारखी झाली आहेत का? त्यांना घरातील हक्काचे स्थान मिळवून देण्यासाठी घरातील तरुण मंडळीनी पुनर्विचार करून त्या दिशेने प्रयत्न करावेत का?
१०. अंगणातील तुळस, गाय, कुत्रे, मांजर इत्यादी पाळीव प्राणी, झाडे, वेली, नद्या यांचा आपला प्रत्यक्ष संपर्क कमी झाला आहे. हे जीवन भरभरून जगण्यासाठी पुन्हा एकदा निसर्गानुकूल जीवनशैली स्वीकारावी का?

११. आपले सर्व सण-समारंभ निसर्गाच्या चक्रानुसार ठरत. त्याला चंद्र व सूर्याच्या स्थितीचाही संदर्भ असायचा. उदा. श्रावणात उपवास करणे, चतुर्थीला उपवास करणे, संक्रांतीला तिळगुळाचे सेवन करणे आदी. आपल्या जीवनशैलीत जुन्या-जाणत्यांनी सांगितलेल्या, पंचांगामध्ये उल्लेख असलेल्या पद्धतीने पुन्हा एकदा सण-समारंभ त्याच पद्धतीने साजरे करायला सुरवात करावी का?

१२. सणांबरोबर संगीत व वाद्यांचेही आपल्या संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. भूपाळीपासून भैरवीपर्यंतचे आपले संगीत शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे व म्युझिक थेरपीच्या मदतीने आजार बरे होतात, हे आधुनिक विज्ञानही सांगते. त्या संगीताचा उपयोग आता आपण पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा का?

चला हे करून पाहू

१) सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे या सवयीने आपले शरीर, मन स्वस्थ राहाते, स्वतःसाठी, व्यायाम, योग, चिंतनासाठी वेळ मिळतो.

२) जागतिक आरोग्य संघटनेने मूलभूत आवश्यकतांमध्ये मनुष्याला आध्यात्मिक आयाम गरजेचा असल्याचे नमूद केले आहे. मानसिक स्थैर्य नामस्मरण, प्रार्थना यांतून मिळते. पसायदान, मनाचे श्लोक, करुणाष्टके यातून मनःशांती आणि बोध दोन्हीही प्राप्त होतात. अशा प्रार्थनांची ओळख रोजच्या जीवनात मुलांना करून दिली पाहिजे. नामजप, स्तोत्रे यांच्या पठणाने ताण, भीती, नैराश्य दूर होते.

३) देहाच्या हालचाली मर्यादित करून त्यातून रोगांना, लठ्ठपणाला आपण आमंत्रण देत आहोत. शक्य तेथे यंत्राचा वापर टाळावा. बेकारी आणि भरपूर मनुष्यबळ असणाऱ्या आपल्या देशात यंत्राचा वापर मर्यादित करून मनुष्याला संधी दिली पाहिजे.

४) घरात सुगंधी वातावरण निर्माण होण्यासाठी राळ, धूप यांचा वापर करा शकतो. डासांना रोखण्यासाठी शेणाच्या गोवरीवर कापूर, कडुनिंबाचा वाळलेला पाला यांचा धूर करू शकतो. परफ्युमऐवजी नैसर्गिक अत्तरे, ताजी सुगंधी फुले यांचा वापर करा. घरामध्ये औषधी वनस्पतींचा वापर करून तयार केलेला धूप, तिळाचे तेल, गायीचे तूप यांचा दिवा दररोज लावणे ही आपली परंपरा आहे.

५) विकतच्या अन्नाबाबात ते कसे तयार केले असेल, स्वच्छता, वापरलेल्या पदार्थांचा दर्जा याबाबत प्रश्न असतात. पॅकबंद अन्न अनेक दिवस साठवणूक केलेले असते. ऋतूमानानुसार ते पदार्थ नसतात तर साठवून हवे तेव्हा उपलब्ध व्हावे म्हणून असतात. तर, घरी केलेल्या अन्नात करणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबाप्रति असणारे प्रेम उतरलेले असते.

६) जाहिरातींच्या माऱ्याने आपल्याला माहितीही नसणारी वस्तू अचानक गरजेची वाटू लागते. मोठमोठे मॉल्स, आजूबाजूला असणाऱ्या बाजारपेठा आणि ऑनलाइन मार्केट यामुळे गरज नसलेली खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, योग्य संस्थेला देणगी देणे अशा विधायक कामात हा पैसा वापरता येऊ शकतो. त्याचबरोबर वस्तूंचा पुनर्वापर, वस्तू जुनी झाल्यास नीट करून वापरणे यात काहीही कमीपणा नाही.
७) पालक नोकरी करणारे असल्याने मुलाला पाळणाघरात सोडावे लागते. पाळणाघर निवडताना काळजी घेणे, आधीच्या पालकांना विचारणे, शक्यतो घराजवळच्या पाळणाघरात मूल ठेवणे ही काळजी घ्यावी. मुलाला सुट्टीच्या दिवशी, सकाळ संध्याकाळी पुरेसा वेळ द्यावा. त्याची स्नेहाची, स्पर्शाची आवश्यकता लक्षात घ्यावी. सुट्टीत त्याला नातेवाइकांकडे न्यावे.

८) आपल्या देशात वर्षभर येणारे सण हे ऋतूचा व कृषी परंपरेचा विचार करून निर्माण झाले आहेत. पूजेच्या निमित्ताने फुले, पत्री वापरली जातात. यामुळे आपण निसर्गाच्या अधिक जवळ जातो. थंडीच्या दिवसांत तीळ-गूळ सेवन करणे उपयुक्त ठरते, तर दिवाळीच्या काळात तळलेले पदार्थ खाल्ले जातात, कारण त्यादरम्यान पचनशक्ती उत्तम असते. आजूबाजूला लहान-मोठी झाडे, फुलझाडे लावून त्यांचे संगोपन करू शकतो.

९) भारतीय संगीत, त्यातील राग हे देश-काल-ऋतू यांवर अवलंबून असतात. आपले हिंदी, मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये रचले गेलेले संगीत, सिनेसंगीत बहुतांश रांगांवर आधारित आहे. त्यामुळे ते ऐकताना मन प्रसन्न होते. भूपाळीपासून भैरवीपर्यंतचे आपले संगीत शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. म्युझिक थेरपीच्या मदतीने आजार बरे होतात, हे आधुनिक विज्ञानही सांगते.ं

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88565 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..