राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. १० : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०१९ मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, श्री सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने चौथे तर सिटी पोस्ट चौक बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या १६२ मंडळांपैकी ११२ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १५ लाख ९ हजार रुपयांची बक्षीसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे विश्वस्त उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी ट्रस्टचे डॉ. रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने आदी उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या रविवारी (ता. १४) सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होईल. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या प्लास्टिक खेळण्यापासून श्री मूर्ती या देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, श्री सुभाषनगर माडीवाले वसाहत मंडळाच्या देखाव्यास ४५ हजारांचे, श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या गाझी पाणबुडी हल्ला या देखाव्यास ४० हजारांचे, काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या नदी जोड प्रकल्प या देखाव्याला ३५ हजारांचे आणि महाराष्ट्र तरुण मंडळाच्या तुमच्यातला एक मी या देखाव्याला ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे. यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाला देण्यात येईल. स्पर्धेच्या परीक्षण मंडळात पराग ठाकूर, डॉ. अ. ल. देशमुख, विजय चव्हाण, कै. अनिल घाणेकर, मधुकर जिनगरे, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर, जयश्री बोकील यांसह सहायक म्हणून बाळकृष्ण घाटे, लिंगराज पाटील, शुभम साळुंके, सौरभ साळेकर, दीप राणे यांनी काम पाहिले.

अध्यक्षांची निवड १५ सप्टेंबरपर्यंत
अशोक गोडसे यांच्या निधनाने रिक्त असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदाबाबत विचारले असता, उत्सवप्रमुख रासने यांनी हे पद १५ सप्टेंबरपर्यंत भरण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88710 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..