बलात्कार प्रकरणांची राज्याने दखल घ्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्कार प्रकरणांची राज्याने दखल घ्यावी
बलात्कार प्रकरणांची राज्याने दखल घ्यावी

बलात्कार प्रकरणांची राज्याने दखल घ्यावी

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः भंडारा, गोंदिया, मावळ आणि भद्रावती येथे महिलांवर झालेल्या बलात्काराची सरकारने दखल घ्यावी. तसेच एसआयटी चौकशी करून जलद गती न्यायालयात दावा चालवून आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेच्या वतीने उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार डॉ. मनीषा कायदे आणि प्रवक्त्या संजना घाडी यांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या पाहणीबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

अंधारे याबाबत म्हणाल्या की, पीडित महिलांच्या आरोग्याबाबत दाद मागण्यासाठी अद्यापही आरोग्य किंवा गृहमंत्री नाही. तसेच महिला व बाल कल्याण मंत्रीही नेमण्यात आलेले नाहीत. सरकारने त्वरित संबंधित खात्यांना मंत्री ही नेमावेत’’. बलात्कार प्रकरणी एसआयटी चौकशी ४५ दिवसांत पूर्ण करून तपास जलद गती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. सरकारने या पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत २ लाख रुपये व शासनाकडून आर्थिक मदत द्यावी. तसेच मनोधैर्य योजनेच्या नावाखाली केवळ ३० हजार रुपयांची मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी अंधारे यांनी या वेळी केली. या प्रकरणाची महिला आयोगाने व मानवी हक्क आयोगाने तातडीने दखल घेऊन राज्य सरकारला नोटिसा द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली. राज्यपाल नको ते वक्तव्य करून सर्वसामान्यांच्या भावना दुखवत असतात, परंतु राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर एकही शब्द बोलत नाहीत. राज्यपालांनी या प्रकरणाची दखल घेऊन राज्य सरकारला उत्तर मागावे असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88741 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..