एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळा
एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळा

एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळा

sakal_logo
By

घनकचऱ्याचा एक मुख्य आणि त्रासदायक घटक म्हणजे प्लास्टिक कचरा. सर्वसाधारणपणे घरगुती घनकचऱ्यामध्ये अंदाजे ५-६ टक्के प्लास्टिक असते. राज्यामध्ये नागरी शहरातून अंदाजे २३ हजार टन प्रतिदिन कचरा निर्माण होतो. त्यात १२०० टन प्रतिदिन इतका प्लास्टिक कचरा असतो. जून २००५ साली मुंबईमध्ये झालेल्या पूरपरिस्थ‍ितीस प्लास्टिक कचरा हे एक कारण होते. प्लास्टिक कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या विविध प्रदूषणविषयक समस्या सोडवण्यासाठी, महाराष्ट्र नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा (नियंत्रण) अधिनियम, २००६ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक व थर्मोकोलपासून बनवलेल्या वस्तूंचे उत्पादन, विक्री, वाहतुकीचे नियमन करण्यासाठी, महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल उत्पादने अधिसूचना २३ मार्च २०१८ रोजी प्रकाशित केली करण्यात आली. त्यानंतर ११ एप्रिल २०१८, ३० जून २०१८, १४ जून २०१९, २८ मार्च २०२२ आणि १५ जुलै दरम्यान अधिसूचना प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, थर्मोकोलपासून निर्मित सिंगल यूज डिस्पोजेबल उत्पादने जसे की, डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटे, वाडगा, कंटेनर, चमचा, नॉन-ओव्हन पिशव्या, द्रव साठवण्यासाठीचे कप/पाऊच वर बंदी आहे. तसेच सजावटीसाठी प्लास्टिक आणि थर्माकोल वापरावर बंदी आहे. प्लास्टिक लेपित तसेच प्लास्टिक थर असणाऱ्या पेपर/अलुमिनियम इत्यादींपासून बनविलेल्या डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटे, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल वापर उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. एकल वापर प्लास्टिक बंदीची सर्वसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर तपशील उपलब्ध आहे. एकेरी वापराचे प्लास्टिक नष्ट करण्याकरिता आणि जिल्हानिहाय उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना २६ एप्रिलला करण्यात आली.

एकल वापर प्लास्टिकला बंदी
- सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरिन
- मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटे, झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या
- प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी, स्ट्रॉ, ट्रे
- प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉनपेक्षा कमी)

महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ अंतर्गत प्रतिबंध
- कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून)
- सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (केरी बॅग्स- नॉन ओवन बॅगसह)
- हॅण्डल असलेल्या व नसलेल्या
- डिश, बाउल, डबे

नंदकुमार गुरव
प्रादेशिक अधिकारी (जै.वै.क.)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88818 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..