सराईत गुन्हेगाराकडून वाहनचोरीचे चार गुन्हे उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत गुन्हेगाराकडून वाहनचोरीचे चार गुन्हे उघड
सराईत गुन्हेगाराकडून वाहनचोरीचे चार गुन्हे उघड

सराईत गुन्हेगाराकडून वाहनचोरीचे चार गुन्हे उघड

sakal_logo
By

पुणे, ता. १० : शहरात विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन दुचाकी, एक रिक्षा ताब्यात घेतली.
रोहीत राजू माने (वय २०, रा. दत्तनगर, भारत नगर, गुजर निंबाळकरवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुजर निंबाळकरवाडी येथे एक बारीक केस व काळसर रंग असलेला मुलगा या भागात येऊन दररोज दुचाकी न्याहाळत आहे. तसेच या भागात तो दुचाकी वरून फिरत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता, या वर्णनाचा एक मुलगा दुचाकी वरून फिरताना दिसून आला. त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, तो जोराने दुचाकी पळवू लागल्याने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याने आंबेगाव पठार येथून दुचाकी व रिक्षा चोरल्याचे कबूल केले असून त्याच्याकडून सर्व गाडया ताब्यात घेतल्या आहेत. त्याच्यावर कोंढवा, खडक आणि भारती विद्यापीठ ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88827 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..