बँकांमध्ये विशेष शिबिरे घ्या : जिल्हाधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँकांमध्ये विशेष शिबिरे घ्या : जिल्हाधिकारी
बँकांमध्ये विशेष शिबिरे घ्या : जिल्हाधिकारी

बँकांमध्ये विशेष शिबिरे घ्या : जिल्हाधिकारी

sakal_logo
By

पुणे, ता. १० : पीक कर्ज वितरण, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) आणि कृषी पायाभूत सुविधा निधी या प्रकल्प प्रस्तावांना गती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखांमध्ये येत्या शुक्रवारी (ता. १२) विशेष शिबिरे आयोजित करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

एसएलबीसी सदस्य बॅंकांच्या पुणे जिल्ह्यातील विभागीय आणि प्रादेशिक व्यवस्थापकांची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा अग्रणी बॅंक तथा महाराष्ट्र बॅंकेचे पुणे शहर क्षेत्रीय महाव्यवस्थापक राजेश सिंग, पुणे पूर्व क्षेत्रीय व्यवस्थापक अभिजित चंदा तसेच अन्य सदस्य बॅंकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

या वेळी जिल्हा अग्रणी बॅंकेने सर्व बॅंकामध्ये प्रलंबित असलेल्या पीक कर्जवाटप प्रस्तावांची तसेच पीएमएफएमई, एआयएफ अंतर्गतच्या प्रस्तावांचा आढावा सादर केला. या सर्व प्रस्तावांची छाननी करून येत्या शुक्रवारच्या शिबिरामध्ये सर्व पात्र प्रस्तावांना त्वरित मंजुरी द्यावी. या कामामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अधिनस्त कार्यालयांनी विशेष सहभाग घ्यावा तसेच शिबिरानंतर याबाबतचा आढावा सादर करावा, अशा सूचना या वेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88868 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..