बौद्ध सांस्कृतिक वारशावर आंतरराष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बौद्ध सांस्कृतिक वारशावर आंतरराष्ट्रीय परिषद
बौद्ध सांस्कृतिक वारशावर आंतरराष्ट्रीय परिषद

बौद्ध सांस्कृतिक वारशावर आंतरराष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः देशातील बौद्ध पुरातत्वीय अवशेषांचा नव्याने शोध आणि बौद्ध सांस्कृतिक वारशाला जाणून घेण्यासाठी ‘भारताचा बौद्ध सांस्कृतिक वारसा: नवीन पुरातत्त्वीय शोध’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागातर्फे आयोजित ही परिषद गुरुवार (ता. ११) ते शनिवार (ता.१३) पार पडणार आहे.

भारतात नव्याने सापडलेल्या बौद्ध वारसास्थळांचे महत्त्व समजून घेणे आणि प्राचीन भारतातील बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका जाणून घेणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेत सुमारे ३० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधक आपले संशोधन उपस्थितांसमोर सादर करणार आहेत. परिषदेसाठी नोंदणी आवश्यक आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88871 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..