राष्ट्रध्वज लावण्यासाठीची नियमावली जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रध्वज लावण्यासाठीची नियमावली जाहीर
राष्ट्रध्वज लावण्यासाठीची नियमावली जाहीर

राष्ट्रध्वज लावण्यासाठीची नियमावली जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. १० : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राष्ट्रध्वज फडकविताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी, जेणेकरून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही, यासाठीची नियमावली विभागीय आयुक्त सौरभ राव जाहीर केली आहे.

या अभियनांतर्गत प्रत्येक घरावर झेंडा फडकविण्यात येणार आहे. ध्वजसंहिता माहिती नसल्यामुळे नागरिकांकडून चुका होण्याची शक्यता आहे. त्या टाळण्यासाठी ही नियमावली सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे.

हे नियम पाळा
- घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकविताना हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशिनद्वारे सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी, लोकरपासून तयार केलेला वापरावा.
- राष्ट्रध्वज हा ३:२ या प्रमाणात असावा. केशरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणे फडकवावा.
- राष्ट्रध्वज उतरवताना सावधतेने व सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
- राष्ट्रध्वज कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही याची काळजी घ्यावी.

या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात
- प्लास्टिक किंवा कागदी ध्वज वापरू नये. कोणत्याही सजावटी वस्तू लावू नयेत.
- राष्ट्रध्वज फडकवितेवेळी फुलांच्या पाकळ्या ठेवू नयेत.
- राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये.
- राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये.
- एकाचवेळी इतर ध्वजांसोबत एकाच काठीवर राष्ट्रध्वज फडकवू नये.
- तसेच तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारच्या शोभेसाठी राष्ट्रध्वजाचा उपयोग करू नये.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88876 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..