आरटीओकडून पाच ‘स्कूलबस’ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीओकडून पाच ‘स्कूलबस’ जप्त
आरटीओकडून पाच ‘स्कूलबस’ जप्त

आरटीओकडून पाच ‘स्कूलबस’ जप्त

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या खासगी वाहतूकदारांच्या पाच स्कूलबसवर आरटीओने कारवाई करीत त्या जप्त केल्या आहेत. त्यामुळे वाहतूक दारांच्या स्कूलबसच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगळवारी ता. (९) हडपसर येथील एन्जल स्कूलच्या आवारात स्कुलबसला आग लागण्याची घटना घडली होती. याची दखल घेत पुणे आरटीओ प्रशासनाने बुधवारी (ता.१०) संबंधित वाहतूकदारांच्या स्कूलबसवर कारवाई केली.

शाळेला सुट्टी असल्याने शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूक दाराने आपली स्कूलबस शाळेच्या आवारात लावली होती. ती अचानक पेटली. याच वाहतूकदाराच्या अन्य पाच स्कूलबसची बुधवारी आरटीओच्या भरारी पथकाने पाहणी केली. त्यावेळी बसची कागदपत्रे तपासले असता त्यांच्याकडे विद्यार्थी वाहतुकीचा परवानाच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर आरटीओने कारवाई करीत त्या पाच बस जप्त केल्या आहेत.

‘‘संबंधित वाहतूक दाराच्या स्कूलबसची कागदपत्रे तपासले असता त्यांच्याकडे आवश्यक असलेली कागदपत्रे आढळली नाहीत. त्यांच्याकडे वाहतूक परवाना देखील नव्हता. त्यामुळे त्या पाच स्कूलबस जप्त केल्या आहेत.’’
- संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88896 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..