‘जनतेच्या पैशातून भाजप नेत्यांची हौस’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जनतेच्या पैशातून भाजप नेत्यांची हौस’
‘जनतेच्या पैशातून भाजप नेत्यांची हौस’

‘जनतेच्या पैशातून भाजप नेत्यांची हौस’

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः ‘‘भारतीय स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करताना, राज्यातील सत्ताधारी भाजप नागरी कररूपी पैशातून जाहिराती करीत करून स्वतःची हौस पूर्ण करून घेत आहेत,’’ अशी टीका राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत तिवारी बोलत होते. सुभाष थोरवे, संकेत मुनोत, भाऊ शेडगे, संजय मानकर, संजय अभंग, महेश अंबिके, शंकर शिर्के, अशोक काळे, उदय लेले आदी यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या चित्रफिती केंद्रीय माहिती व नभोवाणी विभागाकडे आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने या चित्रफिती पुन्हा दाखवून ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणे आवश्‍यक आहे. हर घर तिरंगा’ अभियान राबवताना तिरंगा ध्वजाचा मतिथार्त देखील सत्ताधाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे असून, तिरंगा हा खादी व स्वदेशी कापडाचा असावा, अशीच त्यामागील धारणा व सरकारी धोरण होते.. मात्र हे धोरण बदलून मोदी सरकारने चिन सारख्या शत्रू राष्ट्राला महसूल मिळवून दिला. योग्य नियोजन केले असते तर ही नामुष्की आली नसती, अशी टीका तिवारी यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88900 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..