आशा कर्मचाऱ्याचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशा कर्मचाऱ्याचा मोर्चा
आशा कर्मचाऱ्याचा मोर्चा

आशा कर्मचाऱ्याचा मोर्चा

sakal_logo
By

पुणे ता., १० स्वातंत्र्याचे झाले काय-आमच्या हाती आले काय, स्वातंत्र्याला पंचाहत्तर- किमान वेतनाचे कधी देणार उत्तर, मानधन दयेचे-वेतन हवे हक्काचे आदी विविध घोषणा देत, बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान क्रांती सप्ताह ‘जन की बात’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गतच हा मोर्चा काढण्यात आला. आमच्या कामाची दखल घेतली जावी, तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, आदी प्रमुख मागणी अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांनी केली. अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष व समितीचे निमंत्रक नितीन पवार आणि आशा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष श्रीमंत घोडके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88918 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..