रुफटॉप सोलर योजनेतून वीज निर्मिती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुफटॉप सोलर योजनेतून वीज निर्मिती सुरू
रुफटॉप सोलर योजनेतून वीज निर्मिती सुरू

रुफटॉप सोलर योजनेतून वीज निर्मिती सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : महावितरणच्या रुफटॉप सोलर योजनेला पुणे प्रादेशिक विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २ हजार ३८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्या १३० ग्राहकांचे रुफटॉप सोलर कार्यान्वित झालेले असून याद्वारे ५०० किलोवॅट विजेची निर्मिती होत आहे.

या योजनेत घरगुती वीज वापरासाठीच्या ३ केडब्लूएपर्यंत रुफटॉप सोलर प्रकल्पाला लागणाऱ्या खर्चावर केंद्र सरकारकडून४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे तर ३ ते १० केडब्लूए पर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. घरगुती ग्राहकांना ही सवलत १० केडब्लूए पर्यंत लागू करण्यात आली आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. रुफटॉप सोलरद्वारे तयार झालेली अतिरिक्त वीज महावितरणला विकताही येणार आहे व विकलेल्या विजेचा परतावाही मिळणार आहे. सहकारी गृह निवासी सोसायट्यांना ५०० किलोवॅट पर्यंत घरगुती वापरासाठी रुफटॉप सोलर योजनेसाठी लागणाऱ्या खर्चावर २० टक्के अनुदान मिळणार आहे. रुफटॉप सोलर योजनेसाठी बारामती परिमंडळात ४९८ अर्ज प्राप्त झालेले आहेत, तर कोल्हापूर परिमंडळात २६९ व पुणे परिमंडळात १०२८ अर्ज प्राप्त झालेले आहेत.

रुफटॉप सोलरमुळे घरगुती वीज ग्राहकाला दिवसा निर्माण झालेल्या विजेचा वापर स्वतः करता येईल. तसेच अतिरिक्त वीज विकून पैसेही कमविता येईल. यामुळे विजेचे बिल कमी होण्यास मदत होणार आहे.अधिक माहितीसाठी महावितरणच्या वेबसाइटला भेट द्यावी तसेच उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88967 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..