पैशांसाठी धमकावणाऱ्या सावकारावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैशांसाठी धमकावणाऱ्या सावकारावर कारवाई
पैशांसाठी धमकावणाऱ्या सावकारावर कारवाई

पैशांसाठी धमकावणाऱ्या सावकारावर कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः दरमहा आठ टक्के व्याजाने पैसे वसुली केल्यानंतर आणखी पैशांसाठी धमकाविणाऱ्या खासगी सावकारावर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक दोनने कारवाई केली आहे. झहीर जुल्फीकार सय्यद, (वय ३४, रा. होळकर वाडी, होळकरवाडी ग्रामपंचायत शेजारी, उरुळी देवाची) असे या सावकाराचे नाव आहे. खंडणीविरोधी पथकाकडे या प्रकरणी तक्रार अर्ज आला होता.

फिर्यादीने ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ या दरम्यान हडपसर गाडीतळ येथे आरोपीकडून दरमहा ८ टक्के व्याज दाराने ५ लाख रुपये घेतले होते. फिर्यादीने घेतलेल्या ५ लाख रुपयांच्या मोबदल्यात आरोपीला आतापर्यंत दोन लाख रुपये मुद्दल व ४ लाख ४८ हजार व्याज असे एकूण १० लाख ४८ हजार रुपये दिले आहेत. मात्र, तरीही आरोपी फिर्यादीला फोन करून तसेच भेटून जीवे मारण्याची धमकी देत होता. तसेच आणखीन ३ लाख रुपये मुद्दल व दोन महिन्याचे व्याज ४८ हजार रुपये असे एकूण ३ लाख ४८ हजार रुपयांची मागणी करत होता, असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. आरोपी सय्यद विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89044 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..