शनिवारी ‘श्रीराम गाथा’ कार्यक्रमाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शनिवारी ‘श्रीराम गाथा’ कार्यक्रमाचे आयोजन
शनिवारी ‘श्रीराम गाथा’ कार्यक्रमाचे आयोजन

शनिवारी ‘श्रीराम गाथा’ कार्यक्रमाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः ‘देवांच्या भाषेतून देवांची गाणी’ या संकल्पनेतून ‘श्रीराम गाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संस्कृत आणि मराठी भाषेत गीतरामायणाची गाणी सादर करण्यात येणार आहेत. गायन, नृत्य आणि वादन, अशा त्रिवेणी संगमातून गीतरामायण उलगडणार आहे. यासह एलईडी स्क्रीनचाही कल्पक वापर करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजता एरंडवणे येथील कलमाडी शामराव हायस्कूल येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना रोहित गुळवणी व अश्विनी आपटे यांची असून अश्विनी आपटे या प्रस्तुतकर्त्या आहेत. कार्यक्रमाचे निवेदन भूषण करंदीकर करणार असून याचे लेखन अथर्व ढगे यांचे आहे. कौशिक केळकर, अथर्व वैशंपायन, सानिका वाघ, श्रिया शिंदे, माधव लिमये, क्षितिज भट, केदार टिकेकर, सर्वेश्वरी साठे हे कलाकार सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमास नितीश भारद्वाज, माधव वझे, राहुल रानडे, सानिया पाटणकर, रणजित नातू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89070 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..