अतूट भावबंधाचा दिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतूट भावबंधाचा दिन उत्साहात साजरा
अतूट भावबंधाचा दिन उत्साहात साजरा

अतूट भावबंधाचा दिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः बहीण-भावाच्या अतूट नात्यातील जिव्हाळा वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण गुरुवारी शहरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यातील विविध संस्था-संघटना, शाळा यांनीही रक्षाबंधनानिमित्त विविध उपक्रमही राबवण्यात आले होते.

यंदा रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट नसल्याने बहिणींना भावाची प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी मिळाली. पावसानेही गुरुवारी काहीशी विश्रांती घेतल्याने नागरिकांचा उत्साह वाढला होता. पीएमपी, एसटीनेही रक्षाबंधनासाठी जय्यत तयारी केली होती. नागरिकांना प्रवास सुकर व्हावा यासाठी शहर आणि जिल्हा परिसरात जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे सासरी गेलेल्या अनेक बहिणी या सणासाठी माहेरी आल्या होत्या. बहिणींनी भावाला औक्षण करत त्याच्या दीर्घायुष्याची कामना केली. यानिमित्त बाजारात विविधरंगी आकर्षक राख्यांच्या खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मिठाईच्या दुकानांमध्येही नागरिकांची वर्दळ होती. विविध संस्था-संघटनांनीही पोलिस बांधव तसेच सैनिक पुनर्वसन केंद्रातील दिव्यांग सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. शाळांना रक्षाबंधनानिमित्त सुट्टी असल्याने आदल्या दिवशीच रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

सैनिक बांधवांसोबत रक्षाबंधन
मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सीमेवरील जवान, पोलिस कर्मचारी आणि विशेष मुलांसाठी २७०० राख्या पाठवण्यात आल्या. या राख्या फाउंडेशनच्या पुढाकारातून शाळा, महाविद्यालये आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्रात बनवण्यात आल्या. सेवा आरोग्य फाउंडेशन संस्थेच्या ‘घे भरारी किशोर विकास प्रकल्प’ आणि समृद्धी वर्ग प्रकल्पाच्या किशोरवयीन मुलींनी एका आर्मी युनिटला भेट देऊन सैनिक बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केले. तर, अभिनेत्री मंजू वाघमारे यांनी शिवाजीनगर पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89119 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..