‘मी धामापूर तलाव बोलतोय’चे शनिवारी होणार सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मी धामापूर तलाव बोलतोय’चे शनिवारी होणार सादरीकरण
‘मी धामापूर तलाव बोलतोय’चे शनिवारी होणार सादरीकरण

‘मी धामापूर तलाव बोलतोय’चे शनिवारी होणार सादरीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः वसुंधरा ग्रुप आणि इकॉलॉजिकल सोसायटीच्या वतीने कोकणातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धामापूर तलाव लोकसहभागातून निर्मिती करण्यात आलेल्या ‘मी धामापूर तलाव बोलतोय’ या लघुपटाच्या सादरीकरणाचे आयोजन केले आहे. कोकणातील अलौकिक दूरदृष्टी जगासमोर यावी या उद्देशाने या लघुपटाची निर्मिती केली होती. पुण्यात प्रथमच या लघुपटाचे सादरीकरण होत असून त्याचबरोबर पर्यावरणाच्या विविध पैलूंवर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. चर्चासत्रामध्ये ॲड. अमोघ परळीकर, ॲड. मैत्रेय घोरपडे, केतकी घाटे, शैलजा देशपांडे, समर्थ परब आदी सहभाग घेणार आहेत. हा कार्यक्रम येत्या शनिवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था येथे होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89183 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..