आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर
आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः इयत्ता आठवीमध्ये घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, गुणवत्ता यादी बुधवारी (ता. १०) प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घोषित केला आहे.

आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण घेता यावे, यासाठी दरमहा शिष्यवृत्तीसाठी ही परीक्षा घेण्यात येते. नुकतीच १९ जून रोजी घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेचा निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. या निकालात नाव, जन्म दिनांक आदींमध्ये दुरुस्ती असल्यास संबंधित शाळेने २२ ऑगस्टपर्यंत परीक्षा परिषदेला मेलच्या माध्यमातून कळवावे.

निकाल पाहण्यासाठीचे संकेतस्थळ ः https://www.mscepune.in/ किंवा https://nmmsmsce.in/

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89223 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..