अमित ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर
अमित ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर

अमित ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः मनसेचे नेते अमित ठाकरे हे १२ ते १४ ऑगस्टदरम्यान तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात पुणे शहरासह ग्रामीण भागात मेळावे, बैठका, भेटीगाठी करणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी पत्रकाद्वारे दिली.

पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी ते घेणार आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजता पहिला कार्यक्रम कोथरूड येथे होणार आहे. शाखा अध्यक्ष विराज डाकवे यांच्या कार्यालयाचे उद्‍घाटन ठाकरे करणार आहेत. दुपारी एक वाजता गोखलेनगर, चार वाजता एस. व्ही. देसाई महाविद्यालय येथे कसबा व कॅन्टोन्मेंटच्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. शनिवारी (ता. १३) पर्वती, मावळ, पिंपरी-चिंचवड येथील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. तर रविवारी (ता. १४) शिरूर लोकसभा मतदार संघात दौरा होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89233 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..