बदल्यांसाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्या शिक्षकांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदल्यांसाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्या शिक्षकांवर
बदल्यांसाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्या शिक्षकांवर

बदल्यांसाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्या शिक्षकांवर

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः आंतरजिल्हा बदल्यांसाठी चुकीची कागदपत्रे सादर केलेल्या शिक्षकांवर कडक कारवाई करावी आणि यासाठी शिक्षकांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी, असा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना गुरुवारी (ता. ११) दिला आहे. शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यासाठी प्रसाद यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांसाठी मागील शैक्षणिक वर्षापासून बदल्यांचे नवीन धोरण अमलात आणले आहे. या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीबाबतचा अध्यादेश ७ एप्रिल २०२१ ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या नव्या धोरणानुसारसुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यानुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेनुसार आंतरजिल्हा बदलीस पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग एकमधील आणि भाग दोनमधील शिक्षकांची यादी, शिक्षकांच्या निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा जाहीर करणे आदी टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत.
या बदल्यांसाठी आवश्‍यक कागदपत्रे सादर करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांवर टाकण्यात आलेली आहे. यासाठी शिक्षकांकडून आॅनलाइन बदल्यांबाबतची माहिती आॅनलाइन भरून घेण्यात आली आहे. या माहितीसोबत आवश्‍यक प्रमाणपत्रे अपलोड करण्याचे बंधन या शिक्षकांवर घालण्यात आलेले आहे. परंतु ही प्रमाणपत्रे काही शिक्षकांनी केवळ बदलीसाठी पात्र व्हावे, या उद्देशाने जाणीवपूर्वक खोटी सादर केल्याच्या तक्रारी ग्रामविकास विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचे आयुष प्रसाद यांना दिलेल्या आदेशात ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. जी. वळवी यांनी नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89242 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..