पोलिस आयुक्तालयाकडून ‘दौड’चे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस आयुक्तालयाकडून ‘दौड’चे आयोजन
पोलिस आयुक्तालयाकडून ‘दौड’चे आयोजन

पोलिस आयुक्तालयाकडून ‘दौड’चे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत शहर पोलिस आयुक्तालयाकडून दहा किलोमीटर दौडचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते ८ या दरम्यान पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी ही दौड असणार आहे. दौडचा मार्ग पोलिस मुख्यालय, शिवाजीनगर येथून सुरू होऊन कृषी महाविद्यालयाच्या गेट जवळील चौकातून यु -टर्न घेऊन सिमला ऑफिस चौक जंगली महाराज रस्ता-संभाजी पुलावरून वळून गुडलक चौक हॉटेल रूपाली जवळील चौकातून बीएमसी रोड बीएमससी कॉलेज रोडवरून पत्रकार चौक, त्यानंतर शेल पेट्रोल पंप येथून यु-टर्न करून परत त्याच रस्त्याने पोलिस मुख्यालय असणार आहे. पोलिसांमध्ये आणि नागरिकांना शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी जनजागृती करण्याचा उद्देश आहे. दौडमध्ये पोलिस, सीआयडी, डॉग स्कॉड यांचा सुद्धा समावेश आहे. दौडमध्ये एकूण ६०० पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेमध्ये प्रथम ३ क्रमांक येणाऱ्या (पुरुष व महिला गटात) स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देणार आहे. तसेच प्रथम ३ क्रमांक येणाऱ्या स्पर्धकांना विशेष बक्षीसे देणार आहेत अशी माहिती पोलिस विभागाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89507 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..