वारजेतील ७०० खाटांच्या रुग्णालयात मान्यता पुणे महापालिका ः नेरदलॅंडच्या राबो बॅंकेकडून कर्ज घेऊन उभारण्यात येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारजेतील ७०० खाटांच्या रुग्णालयात मान्यता

पुणे महापालिका ः नेरदलॅंडच्या राबो बॅंकेकडून कर्ज घेऊन उभारण्यात येणार
वारजेतील ७०० खाटांच्या रुग्णालयात मान्यता पुणे महापालिका ः नेरदलॅंडच्या राबो बॅंकेकडून कर्ज घेऊन उभारण्यात येणार

वारजेतील ७०० खाटांच्या रुग्णालयात मान्यता पुणे महापालिका ः नेरदलॅंडच्या राबो बॅंकेकडून कर्ज घेऊन उभारण्यात येणार

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः वारजे येथे ७०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय डिझाइन-बिल्ट-फायनान्स-आॅपरेट-ट्रान्स्फर (डीबीएफओटी) तत्त्वावर बांधण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी ३५० कोटीचे नेरदलॅंडच्या राबो बॅंकेकडून कर्ज घेऊन हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यानंतर खासगी कंपनीच्या माध्यमातून हे रुग्णालय चालविले जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

वारजे येथे डीबीएफओटी तत्त्वावर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव फेब्रुवारी २०२२ मध्ये स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यते मान्य केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या प्रक्रियेला गती आली होती. अखेर महापालिकेला यास मान्यता दिल्याचे कळविले आहे.

अशी होणार रुग्णालयाची उभारणी
- वारजे येथे दहा हजार चौरस फुटाची जागा उपलब्ध
- डिझाइन-बिल्ट-फायनान्स-आॅपरेट-ट्रान्स्फर (डीबीएफओटी) तत्त्वावर खासगी संस्था रुग्णालय उभारणार
- महापालिका नेदरलँडच्या राबो बँकेकडून दीड टक्के दराने ३५० कोटीचे कर्ज घेणार.
- रुग्णालय उभारल्यानंतर कर्जाचे हस्ते संबंधित संस्था फेडणार
- नागरिकांना या रुग्णालयात माफक दरात आरोग्य सुविधा मिळणार
- रुग्णालय चालविणारी संस्थेने काम सोडून दिले तर त्याचा भार महापालिकेवर येऊ नये, यासाठी विमा उतरवणार
- नैसर्गिक आपत्तीत रुग्णालय बंद पडले तर ९८ टक्के व संस्थेने काम थांबविले तर ९५ टक्के विम्यातून नुकसान भरपाई मिळणार
- रुग्णांना सीएचएस दराने उपचार मिळणार. काही खाट हे संबंधित संस्था खुल्या दराने उपलब्ध करून देणार. त्यातून उत्पन्न मिळविणार
- रुग्णालयाची उभारणी, डॉक्टर व कर्मचारी पुरविणे, पगार याची जबाबदारी संबंधित संस्थेची

कोट
‘‘खासगी संस्थेच्या माध्यमातून रुग्णालय उभारण्यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यास शुक्रवारी मान्यता मिळाली आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी नेदरलॅंड येथील राबो बँकेकडून अल्प दरात कर्ज पुरवठा होणार आहे. खासगी संस्थेने कर्जाची रक्कम बुडविल्यास त्याचा भार पालिकेवर येऊ नये, यासाठी विमा उतरविला जाणार आहे. रुग्णालय उभारण्यासाठीची प्रक्रिया लवकर सुरू होईल.’’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका


वैद्यकीय महाविद्यालयासाठी १४७ कोटी
नायडू रुग्णालयाच्या आवारात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयाची स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी १४७ कोटी रुपयांच्या खर्चास शुक्रवारी मान्यता दिली आहे. सध्या कमला नेहरू रुग्णालय आणि बाबूराव सणस कन्याशाळेच्या आवारात हे महाविद्यालय सुरू आहे. नायडू रुग्णालयाच्या आवारात ५०० खाटांचे रुग्णालय व वसतीगृह उभारले जाणार आहे. तसेच शैक्षणिक इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी सुविधा याठिकाणी असणार आहेत. तर नायडू सांसर्गिक रुग्णालय बाणेर येथील कोवीड सेंटर येथे स्थलांतरित केले जाईल, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89566 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..