राज्यात दोन हजाराहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात दोन हजाराहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस
राज्यात दोन हजाराहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस

राज्यात दोन हजाराहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस

sakal_logo
By

वीजचोरीविरोधात १० नवी भरारी पथके

महावितरणची मोहिम ः एप्रिल ते जून दरम्यान अडीच हजार प्रकरणे उघडकीस

पुणे, ता. १६ : राज्यात महावितरणच्या भरारी पथकांने एप्रिल ते जून या कालावधीत वीजचोरीची २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. या पार्श्‍वभूमीवर वीजचोरांविरूद्धची मोहिम तीव्र करण्यासाठी विभागीय स्तरावर दहा नव्या भरारी पथकांची स्थापना करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत.

सिंघल यांनी नुकतीच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीस सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक कमांडर (सेवानिवृत्त) शिवाजी इंदलकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात सध्या ६३ भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिटस आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे, जून या तिमाहीत २३९.५८ दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची २,६२५ प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून सुमारे ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल केला. उर्वरित बिलांची रक्कमही लवकरच संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महावितरणकडून २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये ९,२५० प्रकरणांत ९७.५० कोटींची वीजचोरी उघडकीस आणली. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोना महामारीत शासनाच्या विविध निर्बंधामुळे वीजचोरांविरुद्धच्या कारवायांवर मर्यादा असल्या तरी ७ हजार १६९ एवढ्या मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. यात ८७.४९ कोटींची वीजचोरी पकडण्यात आली. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात वीजचोरीची तब्बल १३,३७० प्रकरणे उघडकीस आणण्यात भरारी पथकांना यश आले. त्यात वीजचोरीची रक्कम २६४.४६ कोटी आहे.

१२४ कोटींची वसुली
वीजचोरीच्या एकूण अनुमानित रक्कमेपैकी २०१९-२० या आर्थिक वर्षात ५४.३६ कोटी, २०२०-२१ मध्ये ५३.१८ कोटी तर २०२१-२२ या वर्षात १२४.९८ कोटी रुपयांची अनुमानित रक्कमेची वीजबिले वीजचोरांकडून वसूल करण्यात आली. वीजचोरी करणे, अनधिकृतपणे वीज वापरणे हा विद्युत कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे ग्राहकांनी प्रामाणिकपणे विजेचा वापर करून कोणत्याही प्रकारे विजेची चोरी करू नये, असेही आवाहनही सिंघल यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89568 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..