कॉनरॅडमध्ये पार पडला सॉलिटेअरचा विशेष संधी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉनरॅडमध्ये पार पडला सॉलिटेअरचा विशेष संधी सोहळा
कॉनरॅडमध्ये पार पडला सॉलिटेअरचा विशेष संधी सोहळा

कॉनरॅडमध्ये पार पडला सॉलिटेअरचा विशेष संधी सोहळा

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः सॉलिटेअरने आयोजित केलेल्या विशेष संधी कार्यक्रमात पुण्याच्या सर्व भागातील रिअल इस्टेट क्षेत्रातील ६०० पेक्षा अधिक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विविध भागातूनही मोठ्या संख्येने अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास हजेरी लावली. हॉटेल कॉनरॅडमध्ये शुक्रवारी (ता. १२) हा कार्यक्रम झाला.
या संधी सोहळ्याने, बिबवेवाडीतील ‘महाट्रेड मार्केट’ (एमटीएम) या प्रकल्पावर प्रकाशझोत टाकला. या कार्यक्रमात सॉलिटेअरच्या अधिकाऱ्यांनी मान्यवरांना ‘एमटीएम’च्या साइटवर सुरु असलेल्या बांधकामाची प्रगती सांगितली. तसेच साऊथ-सेंट्रल पुण्याला व्यवसायाचा एक इच्छित केंद्रबिंदू होण्यास कसा हातभार लावेल, याबाबत स्पष्टीकरण केले. सॉलिटेअरचे प्रकल्प त्यांच्या खरेदीदारांसाठी आणि त्यांच्या सर्व व्यावसायिक सहयोगींसाठी फायदेशीर आहेत. तसेच अनेक उपस्थितांनी या पैलूंबाबतचे त्यांचे वैयक्तिक अनुभवही याप्रसंगी सांगितले. बिबवेवाडीतील ‘एमटीएम’ हा प्रकल्प पुण्यातील रिअल इस्टेट समुदायामध्ये चर्चेचा मुख्य विषय झाल्याचे उपस्थितांच्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून सॉलिटेअरने अनेकांसाठी व्यवसायाच्या संधींची नवीन दारे उघडली आहेत. टीम सॉलिटेअरने संध्याकाळनंतर मान्यवरांसोबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला आणि मान्यवरांना बोलते केले. उपस्थितांमध्ये रंगलेल्या चर्चेत ‘एमटीएम’ ही एक संकल्पना असून त्यात आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा कसा राखला आहे, आणि त्याचा भविष्यात व्यापारी आणि गुंतवणूकदारांना कसा फायदा होईल, याबद्दल झालेल्या चर्चेतून सॉलिटेअर नजीकच्या काळात नवीन संधींची एक लाट सादर करेल, असे जाणवले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89792 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..