‘द्विलक्षी’च्या प्रवेशासाठी रविवारपर्यंत द्या पसंतीक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘द्विलक्षी’च्या प्रवेशासाठी 
रविवारपर्यंत द्या पसंतीक्रम
‘द्विलक्षी’च्या प्रवेशासाठी रविवारपर्यंत द्या पसंतीक्रम

‘द्विलक्षी’च्या प्रवेशासाठी रविवारपर्यंत द्या पसंतीक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत द्विलक्षी विषय प्रवेशासाठी नियमित फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना येत्या रविवारपर्यंत (ता. १४) पसंती देता येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

या प्रवेश प्रक्रियेंतर्गत द्विलक्षी विषय प्रवेशासाठी सर्वसाधारण फेरीमधून प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असणार आहेत. विद्यार्थ्यांनी ज्या तुकडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्या तुकडीसाठी उपलब्ध असलेल्या द्विलक्षी विषयांसाठी फक्त अर्ज करता येईल. प्रत्येक फेरीसाठी यापूर्वी प्रवेश घेतलेल्या सर्व फेऱ्यांतील विद्यार्थी पात्र राहतील. एका फेरीमध्ये अर्ज करू न शकलेले विद्यार्थी पुढील फेरीवेळी अर्ज करू शकणार आहेत.

विद्यार्थ्यांनी अर्ज केलेल्या द्विलक्षी विषयाबाबत पसंती आपल्या विद्यालयास कळविणे आणि गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी त्या द्विलक्षी विषयासाठी विद्यालयाने दिलेल्या वेळेत आपला प्रवेश निश्चित करणे, यासाठी १५ ते १७ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत द्विलक्षी विषय प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी डाऊनलोड करून त्याची तुकडी आणि विषयनिहाय आरक्षणानुसार गुणवत्ता याद्या तयार करण्यात येणार आहेत.

विषय व तुकडीनिहाय अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या स्वतंत्र असणार आहेत. विषयनिहाय गुणवत्ता व आरक्षणानुसार पात्र ठरत असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांची मान्यता घेण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी यापूर्वीच कार्यवाही करणे गरजेचे आहे. तसेच व्यवसाय शिक्षण कार्यालयाची मान्यता मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कळवावे आणि प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने केली आहे. द्विलक्षी विषय प्रवेशामध्येही आरक्षण लागू असलेल्या तीन फेऱ्या होतील आणि त्यानंतर विशेष फेरीप्रमाणे गुणवत्तेनुसार खुले प्रवेश होतील, असेही शिक्षण विभागाने शनिवारी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89891 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..